आजपासून मुंबईसह ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद!


नवी मुंबई (प्रतिनिधी) कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सुद्धा प्रभावित होणार आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत धावणारी एसी लोकल आजपासून बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही लोकल सेवा बंद राहणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली आहे. तसेच, मध्य रेल्वेने सुद्धा ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी, पनवेल-बेलापुर या दरम्यान चालवण्यात येणाऱ्या १६ एसी लोकल देखील __ आज दि. २० मार्च पासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासहित मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. __ एसी लोकलमधून प्रवास करताना कुणालाही करोनाची लागण होऊ नये, नागरिकांनी गर्दीतून प्रवास करणे टाळावे यासाठी ही सेवा बंद करण्यात येत असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितलं. एसी लोकल बंदिस्त असते, त्यामुळे एखाद्याच्या शिंकण्यामुळे बाहेर पडणारे जंतूंना लोकलच्या बाहेर पडण्यास वाव नसतो. त्यामुळे त्याचा कुणालाही संसर्ग होऊ शकतोशिवाय एसी लोकलचे तापमान अत्यंत कमी असल्याने संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एसी लोकल बंद करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यानएसी लोकल सेवा बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार असली तरी प्रवाशांच्या हितासाठीच हा रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वास्तविक मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा सुद्धा बंद ठेवण्यात याव्यात अशा मागण्या होत होत्यामात्र अर्थातच मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकलसेवा बंद केल्यास लाखो नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागू शकतो, तसेच आपात्कालीन परिस्थितीत असा निर्णय घेणे चुकीचे ठरेल असे सांगत मागणी राज्य सरकारकडून फेटाळून लावण्यात आली होतीमात्र आता कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहन हा निर्णय घेण्यात आला आहे.