पनवेल (प्रतिनिधी) - सिडकोने प्रकल्पग्रस्तांना सार्वजनिक भूखंड (मैदान) सार्वजनिक उपक्रमासाठी प्रामुख्याने धार्मिक, सांस्कृतिक, इतर सामाजिक व अन्य कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून द्यावेत व त्याबाबत भू-भाड्याची रक्कम आकारणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल शिवसेनेच्या पदाधिका-यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना विचारला होता. या मागणीची दखल घेत सिडकोने संबंधित जागेचा वापर करण्यासाठी भू-भाड्यामध्ये प्रकल्पग्रस्तांना ५०% सुट देण्याची तरतूद केली आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, शाखाप्रमुख संतोष पाटील, शिवतेज मित्र मंडळ खारघर अध्यक्ष रमेश पाटील आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे सहाय्यक वसाहत अधिकारी वावमोणी यांची भेट घेतली. सिडकोच्या आराखड्यानुसार खारघर परिसरात किती भूखंड (मैदाने) मनोरंजनासाठी, धार्मिक, सांस्कृतिक, इतर सामाजिक व अन्य कार्यक्रमासाठी लग्न समारंभासाठी आरक्षित केलेली आहेत. तसेच त्या भूखंड (मैदानामध्ये) कोणकोणत्या जुजबी सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत याची माहिती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी __सांगितले. या संदर्भात स्थानिक __प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी चर्चा होणे गरजेचे असून या समस्यांची तड लावावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला सिडकोने सकारात्मक दृष्टीकोन दाखवून यापुढे संबंधित भूखंडाच्या वापराच्या वेळी प्रकल्पग्रस्तांना ५०% ची सुट देण्याची तरतूद करण्यात आल्याचे संबंधित पत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांना मिळणार सार्वजनिक भूखंड