वाशी (वार्ताहर) - व्हेलमाशाची वांती (अंबरग्रीस) असल्याचे सांगुन ती दलालाच्या मार्फतीने दोन कोटी रुपयांना विक्री करण्यासाठी घेवुन आलेल्या दोघा जणांना गुन्हे शाखा कक्ष -१ पोलिसांनी सापळा रचून नुकतीच जेरबंद केले आहे. रिझवान जैनद्दीन फडणीस (वय ३३वर्ष) रा.मु.पो.गुहागर,जि. रत्नागिरी व राजेश रावसाहेब सुर्वे (वय ३३वर्ष) रा.मु.पो चिपळुन, जि. रत्नागिरी अशी याप्रकरणी अटक केलेल्या दोघांची नवे आहेत. __ दोन इसम वाशी रेल्वे स्टेशन जवळील बस डेपो याठिकाणी व्हेल माशाची उलटी अनधिकृत रित्या जवळ बाळगुन तिची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार गुन्हेशाखा कक्ष-०१ चे एपीआय राहुल राख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दि २९ रोजी सापळा रचून सदर दोघांना ताब्यात घेतले. गुन्हेशाखा कक्ष ०१ मधील सपोनि नाईक, सहा. फौजदार थोरात, तायडे, केळकंद्रे, पो.ना.जगदाळे, पो.ना. कनखरे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. वन्य जीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम ३९, ४८अ, ४९बी, ५१ व ९ दाखल करण्यात आला आहे.
व्हेल माशाची वांती विक्रीसाठी आलेली दुकली अटकेत