उरण फाट्याजवळ ट्रॅकने चिरडल्याने एकाच मृत्यू

बेलापूर(वार्ताहर)- किल्ला जगंशन ते उरण फाट्याकडे जाणा-या रोडवर सिमेन्टच्या ब्लाँकने भरलेल्या अठरा चाकी ट्रक ने स्कुटी चालकास चिरडल्याने झालेल्या अपघातात एकाच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना दि.२७ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास झाली. अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव जफरुद्दीन खान (१९)रा. शिवाजीनगर झोपडपट्टी एमआयडीसी, नेरुळ असे असून जखमी तरुणाचे नाव राहुल राजेश दिवाकर असे आहे. याबाबत हकीकत अशी कि, या घटनेतील मृत तरुण जफरुद्दीन खान हा आपल्या स्कुटीवरून मित्र राहुल दिवाकर यांच्यासमवेत उलवा येथुन शिवाजी नगर येथील घरी जात होते. यावेळी किल्ला जगंशन ते उरण फाट्याकडे जाणा-या रोडवर अठरा चाकी ट्रकने चिरडल्याने जफरुद्दीन खान याचा जागीच मृत्यू झाला तर राहुल दिवाकर जखमी झाला. घटनेनंतर ट्रकचालक पळून गेला असून याबाबत मृत जफरुद्दीन खान याच्या भावाने सीबीडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसानं ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.