नवी मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्रराज्य विद्युत वितरण कंपनी यांचे मार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील १००/२२ केव्ही सबस्टेशनचे देखभाल दुरुस्तीची काम हाती घेण्यात येणार असल्याने या कामासाठी येत्या सोमवारी (दि.१६) जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात दिनांक १६ मार्च रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महापालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच मंगळवार दि.१७ मार्च रोजी कमी वेळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी याची दखल घ्यावी तसेच पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
सोमवारी पाणीपुरवठा बंद तर मंगळवारी कमी दाबाने होणार परवठा