वकील महिलेचा हुंड्यासाठी छळ सासरच्या तिघाजणांविरोधात गुन्हा

नवी मुंबई (प्रतिनिधी)- तळोजा येथील एका वकील महिलेचा सासरच्या मंडळींकडून हंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी वकील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तळोजा पोलिस ठाण्यामध्ये पतीसह सासरच्या तिघा व्यक्तींविरोधात भादंवि कलम ३२३, ३४, ४९८ अ, ५०४, ५०६३ अश्या विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पीडित वकील महिला सध्या तळोजा येथे आपल्या आईसह राहते. दिपाली असे या महिलेचे नाव असून तिचे राजस्थान भिलवाडा येथील आदीत्य भरतसिंह नानावटी (३६) याच्याशी १४ मे २०१९ रोजी हिंद धार्मीक रितीरिवाजाने राधाकृष्ण मंदीर भिलवाडा राजस्थान येथे विवाह झाला. मात्र विवाहाच्या दुस-या दिवसापासुन तिची सासु व पतिने लग्नामध्ये पतीस कपडयाकरीता फक्त २५00 रु. दिले. तसेच पाहण्यांचा व्यवस्थीत मानपान के ला नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा त्रास सुरूच असल्यामुळे अखेरीस या त्रासाला कंटाळू न वकील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तळोजा पोलिस ठाण्यामध्ये पती आदित्य नानावटी, सासू स्नेहलता नानावटी व सासरे भरतसिंह नानावटी अश्या तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.