ठाणे-पनवेल एसी लोकलची संतप्त प्रवाशांकडून तोडफोड


पनवेल (वार्ताहर) - हार्बर मार्गावर अवघ्या महिन्याभरापूर्वी सुरु करण्यात आलेल्या पनवेल-ठाणे एसी लोकलच्या काचा फोडण्याचा प्रकार प्रवाश्यांकडून घडला आहे. जेव्हा गर्दीच्या वेळी साध्या लोकल न सोडता एसी लोकल सोडण्यात आली तेव्हा भडकलेल्या प्रवाशांनी एसी लोकलच्या काचा फोडल्या आणि सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली. ___ इतर रेल्वे मार्गांच्या तुलनेत हार्बर मार्ग नेहमीच उपेक्षित राहिला आहे. जुन्या लोकलपासूनची ते उशिरा धावणाऱ्या लोकलपर्यंत सर्व काही हार्बर मार्गावरील प्रवाशांनी सोसले. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सुखसोई मिळाव्यात म्हणून म्हणा किंवा भविष्याचा विचार करून म्हणा, हार्बर मार्गावर पनवेल-ठाणे आणि ठाणे-पनवेल मार्गावर नव्या कोऱ्या एसी लोकलच्या दिवसातून १६ फेन्या सुरु करण्यात आल्या. या लोकलमुळे कामावरून थकलेल्या कामगारांचा प्रवास गारेगार करण्याहेतूने मध्य रेल्वेने ही लोकल सुरु जेली. परंतु एसी लोकलमुळे प्रवाशांचा त्रास कमी होण्याच्या ऐवजीतो अजून वाढला असल्याचे दिसत आहे. कधीही उशिरा न सुटणा-या ठाणे पनवेल मार्गांवरील लोकल या लोकलमुळे उशिराने धावू लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल वाढले. सोबतच जर पनवेल ते ठाणे हा प्रवेश सध्या लोकलने १५ रुपयांमध्ये करता येतो तर एसी लोकलच्या एका प्रवासाचे भाडे १९४ रुपये आहे जे सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरचे आहे आणि त्यामुळेच कि काय या नव्या लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरविली. यदाकदाचित चुकून तिकीट नसताना एखाद्या प्रवाशाला या लोकल मधून प्रवास करताना पकडले गेले तर तिकीट दाराच्या तिप्पट रक्कम दंड म्हणून आकारली जात असल्यामुळे या लोकलमध्ये जाण्यापेक्षा उशिराने घरी पोचलो तरी चालेल असे प्रवाशाचे मत आहे.