महापे (वार्ताहर)- महापे - शील रोडवर काल दुपारच्या सुमारास एका टंकरला अचानक आग लागली. या आगीत वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक जखमी झाला असून त्याला मुंब्रा येथील खासगी त्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टँकरमध्ये फ्लेमेबल केमिकल असल्याची माहिती ठाणे अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी दिली. दपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर पलटी झालेल्या या टँकरला आग लागली. तसेच केमीकलची गळती सुरु झाली. तात्काळ अग्निशमन दलाने धाव घेत आग विझविण्यास सुरुवात केली. दोन फायर इंजिन आणि तीन पाण्याचे टँकर यांच्या मदतीने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यास जवानांना यश आले. तसेच के मिक लची गळती थांबवण्यात आली. मात्र आगीमुळे महापे रोडवर मोठ्या प्रमाणवर वाहतूक कोंडी झाली होती. तर टँकर चालक नेमका कसा जखमी झाला हे अद्याप समजू शकले नाही. सुरुवातीला हा टँकर पेट्रोलचा असल्याची चर्चा होती मात्र टँकरमध्ये फ्ले मेबल केमिकल असल्याचे झळके यांनी सांगितले. क्रेनच्या सहाय्याने टँकर हटवण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात आला.
महापे-शीळ रस्त्यावर टँकरला आग