कोरोनाचा धसका; आयपीएल पुढे ढकलली!


मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसचा धोका वाढल्याने येत्या दि.२९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धा तूर्त स्थगित करण्यात आली असून ती आता एप्रिलच्या मध्यापर्यंत पुढे ढ क लण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्राने देखील यावर्षी स्पर्धा घेऊ नये असा सल्ला दिला होता आणि स्पर्धा घेणार असाल तर त्या रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय घ्याव्यात असे सरकारचे म्हणणे होते. कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्य आणि आयपीएलमधील शेअरहोल्डर्स यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात बीसीसीआय भारत सरकार, क्रीडा मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संपर्कात असल्याचे शहा यांनी निवेदनात म्हटले आहे. बीसीसीआयने याआधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २९ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईत होणार होता.