पनवेल (प्रतिनिधी) - नवीन पनवेलमधील विजेच्या उघड्या डीपींना झाकणे बसवावीत, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सुशिला जगदीश घरत यांनी महावितरण कंपनीकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी नवीन पनवेल महावितरणचे मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नवीन पनवेल येथील सेक्टर १३, १४, १५, १६, १७, १८ मधील अनेक ठिकाणी महावितरणाच्या वीज डीपी आहेत. तसेच यातील अनेक डीपी रस्त्यावर, मैदानात आणि सोसायटीच्या आवारात आहेत. अनेकदा यातील उघड्या डीपीमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मैदानात लहान मुले खेळत असतात त्यामुळे त्याचा धक्का मुलांना लागू शकतो आणि दुर्दैवी घटना घडू शकते, हा संभाव्य धोका टाळण्यासाठी याकडे विशेष लक्ष देऊन डीपी झाकणाच्या साहाय्याने पूर्णपणे झाकण्यात याव्यात. अन्यथा उघड्या डीपीमुळे अपघात झाल्यास त्यास महावितरण जबाबदार असेल, असेही नगरसेविका सुशिला घरत यांनी नमूद केले आहे.
झाकणे बसविण्याची मागणी