येस बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध..

पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या बँकेबाहेर रांगा



वाशी (प्रतिनिधी) - आर्थिक स्थिती खालावत चालली असल्याचे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी निर्बंध लागू केल्यामुळे बँकेच्या खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार रुपयेच काढता येणार आहेतदरम्यान, येस बँकेच्या खातेधारकांना याबाबतची माहिती मिळताच काही ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीच एटीएममध्ये धाव घेतली होती. तर काल सकाळपासून ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी येस बँकेच्या बाहेर एकच गर्दी केली होती. वाशी से-१ येथील परिसरात असलेल्या येस बँकेसमोर ग्राहकांनी सकाळपासून रांगा लावून आपल्या ठेवी काढण्यासाठी गर्दी केली असल्याचे चित्र दिसत होते. पीएमसी बँके प्रमाणे येस बँक देखील बंद होऊन आपल्यावरही तीच वेळ येते कि काय अशी भीती ग्राहकांना वाटत आल्याने आपल्या ठेवी काढण्यासाठी त्यांनी बँकेबाहेर गर्दी केली होती. दरम्यान, बँकेला भांडवल उभे ण्यात अपयश आल्यामळेकरण्यात अपयश आल्यामुळेबँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला तसेच एकूण व्यवसायाची गुणवत्ता घसरल्याचे कारण देत रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लागू केले आहेत. 'बँकेच्या व्यवस्थापनाशी आरबीआयने सतत चर्चा करून बँकेचा ताळेबंद सक्षम कसा करता येईल तसे तरलता कशी ठेवता येईलयाबाबत सर्व शक्यता आजमावल्याआपण विविध गुंतवणूकदारांशी चर्चा करत असल्याचे व त्यात त्यांना यश येणार असल्याचे बँकेने आरबीआयला सांगितले होते. १२ फेब्रुवारी रोजी बँकेने शेअर बाजारांना सांगितल्यानुसार, बँक काही खासगी इक्विटी कंपन्यांकरवी भांडवल मिळवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, अखेर बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने आरबीआयने बँकिंग नियमन कायदा कलम _४५ अंतर्गत निर्बंध लागू केले, असे आरबीआयच्या पत्रकात म्हटले आहे. आरबीआयने येस बँकेचे संचालक मंडळ ३० दिवसांसाठी बरखास्त करून भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.