कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईची निवडणुक पुढे ढकला

राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी


नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसचे वाढते स्वरूप लक्षात घेता आगामी काही दिवसात येऊ घातलेली नवी मुंबई महापालिकेची निवडणूक-२०२० ही काही कालावधीसाठी पुढे ढकळण्यात यावी अशी मागणी तुर्भेगाव सुधार संस्थेतर्फे राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत तुर्भेगाव सुधार संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सध्या जगात बऱ्याच देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही काही भागात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका घेतल्यास नवी मुंबईत या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या प्रचार सभा, मोर्चे, बाईक रॅली आदींमुळे गर्दी जमा होणे साहजिकच असल्याने ते नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिका निवडणूक २०२० ही काहीकालावधी साठी पुढे _ ढकळण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.