नवी मुंबई (प्रतिनिधी) - मिस नवी मुंबई २०२० चा ताज रिया मेक्कट्टकुलूम या सौंदर्यवतीने पटकावला. दुसऱ्या व तिसऱ्या जागेवर अनुक्रमे निमिषा पराशर (गर्ल ऑफ दि शो) व प्रकृती राव (बेस्ट स्माईल) हिने बाजी मारली. मिस नवी मुंबईच्या नवव्या पर्वाचा अंतिम सोहळा वाशी येथील सिडकोच्या सभागृहात संपन्न झाला. सोळा सौंदर्यवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. परीक्षक म्हणून मिस दिवा सुपर नॅशनल २०१९ शेफाली सूद,मॉडेल व अभिनेता जितेश निकम, डॉ.हनी, संजीव कुमार, अशोक मेहरा यांनी काम पाहिले. प्राथमिक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत शेकडो मुलींनी सहभाग नोंदविला आणि यापैकी सर्वच फेरीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या फक्त सोळा सौंदर्यवती यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.
रिया ठरली मिस नवी मुंबई नवव्या पर्वाची विजेती! |