नवी मुंबईकरांची चिंता वाढली...! शहरात दोन दिवसांत 431 कोेरोनाबाधित!

नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्यावर कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरीयंटचे संकट घोंगावत आहेत. त्यात नवी मुंबईसह शेजारच्या  पनवेल महापालिका हद्दीत ओमोयक्रॉनसह कोरोना रुग्ण आढळत असल्याने या दोन्ही ठिकाणच्या महापालिका प्रशासनांची चिंतेत भर पडली आहे. काल नवी मुंबईत तब्बल 266 नवे कोरोनाबाधित आढळले होते. तर बुधवारी शहरातील कोरोना बाधितांची संख्या 165 इतकी होती. त्यामुळे बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत नवी मुंबईत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 431 वर गेली आहे. तर पनवेल महापालिका हद्दीत काल 68 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, नवी मुुंबई व पनवेल मनपा हद्दीत एकीकडे रूग्ण संख्या वाढत असतांना नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होतांना दिसत नसल्याने कोरोनारुग्णवाढ ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा ठरू लागली आहे.