+ वर्षभरात 21 कोटींहून अधिकचा दंड वसूल
+ 2 लाख 55 हजार 920 वाहनचालकांविरोधात केसेस
नवी मुंबई (नितीन पडवळ) - राज्यातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता राज्य वाहतुक विभागाचे अपर पोलीस महासंचालक भुषणकुमार उपाध्याय यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांच्यावतीने वर्ष 2021 मध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्तपणे वाहन चालविणार्या एकूण 2 लाख 55 हजार 920 वाहनचालकांविरोधात केसेस दाखल करून चलनाव्दारे एकूण 21 कोटी 2 लाख 53 हजार पाचशे रूपयांचा दंड वसूल केला आहे.
वर्ष 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये प्राणांतिक अपघातात घट! - पळस्पे केंद्रातील अधिकारी व कर्मचार्यांकडून वेळोवेळी वाहतुक नियमांचे उल्लंबन करणार्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासह वाहन चालकांचे प्रबोधन करण्यावर भर दिला जातो. याचा परिपाक म्हणून महामार्ग पोलीस केद्र पळस्पे हद्दीत सन 2021 मध्ये झालेले प्राणांतिक अपघात हे सन 2020 च्या तुलनेत कमी आहेत. तर वर्ष 2020 मध्येे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7423 केसेस, लेनकटिंग, सीट बेल्ट नसणे, मोबाईल संभाषण करणे व इतर स्वरुपाच्या 67260 केसेस अशा एकूण 74683 केसेस दाखल करून एकूण 1 कोटी 37 लाख 24 हजार पाचशे रूपयांचा दंड वसूल केला होता.असे याविषयी माहिती देतांना प्रभारी सहा पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.