नवी मुंबईत पदव्युत्तर पदवी मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी हालचाली!

 आयुक्तांकडून नियोजन कार्यवाहीचा आढावा


नवी मुंंबई (प्रतिनिधी)-  नवी मुंबईकर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालय सक्षमीकरणावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वत:चे पदव्युत्तर पदवी (पीजी) मेडिकल कॉलेज सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. याव्दारे अधिक चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा नवी मुंबईकर नागरिकांना उपलब्ध होणार असून याबाबतच्या नियोजन कार्यवाहीचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी काल विशेष बैठकीत आढावा घेतला. यावेळी या विशेष बैठकीमध्ये आयुक्तांनी मे 2023 च्या शैक्षणिक सत्रात मेडिकल कॉलेज सुरु करून त्यामध्ये पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाची पहिली बॅच सुरु करण्याच्या दृष्टीन