डिस्ट्रीक्ट चेअरमन यांची इनरव्हिल क्लबला भेट


 इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग यांनी नुकतीच इनर व्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनला भेट दिली. इनरव्हील क्लबमधील सदस्यांनी यावेळी त्यांचे जोरात स्वागत केले. क्लब प्रेसिडेंट वृषाली सावळेकर यांच्या कामाचे सिंग यांनी कौतुक केले. यावेळी क्लब बुलेटिन प्रतिबिंबचे प्रकाशन डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास क्लबचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.  माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, सुलोचना कल्याणकर यांची यावेळी उपस्थिती लाभली होती.