उरण प्रा. शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत स्वाभिमानी पॅनलची बाजी

 



जेएनपीटी (वार्ताहर) - उरण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रमणिक म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाला आहे. उरण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत  स्वाभिमान शिक्षक मित्र पॅनल यामध्ये सामिल झाले होते. जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे पदाधिकारी रमणिक म्हात्रेंच्या रूपाने उमेदवारी मिळाली होती.यावेळी स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवत बाजी मारली.

याप्रसंगी स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलचे प्रमुख सुभाष भोपी नरेश मोकाशी, जयदास घरत इतर सदस्य यांनी खुप मेहनत घेतली.तसेच उरण तालुक्यातील शर्मिला गावंड, अविनाश कोळी व.संदीप  पाटील हे शिलेदारही या पतपेढीच्या निवडणुकीत निवडून आले यावेळी जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे राज्याध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस संदीप परब, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक संघ शिवाजी गट रायगड अध्यक्ष  राजेंद्र म्हात्रे, राजेश जाधव आदींनी सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे तथा संचालकांचे  अभिनंदन केले.