मुंबई (प्रतिनिधी) - मुद्रित,
इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच विविध
समाजमाध्यमे देखील महत्त्वाची
आहेत. माहिती व जनसंपर्क
अधिकार्यांनी येत्या काळात
समाजमाध्यमांचा अधिकाधिक वापर
करुन शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे
काम करीत अचूकता आणि
गतिमानतेवर भर द्यावा, असे
आवाहन नवनियुक्त माहिती व
जनसंपर्क महासंचालक तथा सचिव
दीपक कपूर यांनी केले.
सनदी अधिकारी दीपक कपूर हे
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी दीपक कपूर
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय
संचालक या पदावर कार्यरत आहेत.
त्यांनी काल माहिती व जनसंपर्क
महासंचालक तथा सचिव पदाचा
अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप
पांढरपट्टे यांच्याकडून स्वीकारला.
यावेळी संचालक (प्रशासन) गणेश
रामदासी यांनी पुष्पगुच्छ देऊन
कपूर यांचे स्वागत केले तर डॉ.
पांढरपट्टे यांना निरोप देण्यात आला.
यावेळी प्रभारी संचालक (वृत्त-
जनसंपर्क) दयानंद कांबळे,
उपसंचालक (प्रशासन) गोविंद
अहंकारी, उपसंचालक
(प्रदर्शने)सीमा रनाळकर,
उपसंचालक (प्रकाशने) अनिल
आलुरकर यांचेसह विभागातील
अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.