ऐरोली (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका (आरोग्य विभाग) यांच्या विद्यमानाने शनिवारी ऐरोली से-10 येथील डी.ए.व्ही पब्लिक स्कूलमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुला- मुलींसाठी मोफत कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने मुला-मुलींनी या शिबीरात सहभागी होवून लाभ घेतला. यासाठी अॅड. कृष्णप्रिया निकेतन पाटील व भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष निकेतन पाटील यांचे सहकार्य लाभले.