पनवेल (प्रतिनिधी) - सिडकोने विमानतळाची कामे जलद गतीने सुरू केली. परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसह सदर संपादीत जमिनीचे नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्न, पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रक्रीयेमध्ये निर्माण झालेले प्रश्न तसेच विमानतळ भरावामुळे डुंगी, पारगाव, खालचे ओवळे, दापोली व भंगारपाडा या गावात पाणी साचत असल्याने त्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, असे महत्वाचे व इतर प्रश्न सिडकोने अद्यापपर्यंत सोडविलेले नाहीत. त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या इतरही अनेक प्रलंबित मागण्या सिडकोकडे प्रस्तावित आहेत, अशी माहिती पनवेल तालुक्यातील पुष्पकनगर येथील गणेश मंदिरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. (उर्वरित पान 3 वर)