मुंबई - आयकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 31 डिसेंबर 2021 या विस्तारित देय तारखेपर्यंत जवळपास 5.89 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. 31 डिसेंबर 2021 रोजी 46.11 लाखाहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली. पोर्टलवर सुरळीत अनुभवासह करदात्यांना मदत करण्यासाठी, मदत कक्षाद्वारे 16,850 करदात्यांच्या कॉल्स आणि 1,467 चॅट्सना प्रतिसाद देण्यात आला.
याव्यतिरिक्त, विभाग सक्रियपणे त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मदतीसाठी करदाते आणि व्यावसायिकांशी संपर्क साधत आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. 31 डिसेंबर 2021 या एका दिवसात, करदाते आणि व्यावसायिकांच्या 230 हून अधिक ट्विटला प्रतिसाद देण्यात आला. लेखा वर्ष 2021-22 साठी 31 डिसेंबरपर्यंत भरल्या गेलेल्या 5.89 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांचे प्रकारनिहाय वर्गीकरण पुढीलप्रमाणे 49.6% आयटीआर 1 (2.92 कोटी), 9.3% आयटीआर 2 (54.8 लाख), 12.1% आयटीआर 3 (71.05 लाख), 27.2% आयटीआर 4 ( 1.60 कोटी), 1.3% आयटीआर 5 (7.66 लाख), आयटीआर 6 (2.58 लाख) आणि आयटीआर 7 (0.67 लाख) आहे. यापैकी 45.7% पेक्षा जास्त आय टी आर पोर्टलवर ऑनलाइन खढठ फॉर्म वापरून दाखल केले गेले आहेत आणि उर्वरित ऑफलाइन सॉफ्टवेअर युटिलिटीजमधून तयार केलेल्या खढठ वापरून अपलोड केले गेले आहेत. 10 जानेवारी, 2021 (लेखा वर्ष 2020-21 साठी आय टी आर ची विस्तारित देय तारीख) पर्यंत, दाखल केलेल्या आय टी आर ची एकूण संख्या 5.95 कोटी होती आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 10 जानेवारी, 2021 रोजी 31.05 लाख आय टी आर दाखल झाले होते. त्या तुलनेत या वर्षाच्या शेवटच्या दिवशी 46.11 लाख प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली. सर्वांना सुरळीत आणि स्थिर करदाता सेवेचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अथक परिश्रम करण्याच्या आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो असे म्हणत विभागाने करदाते, कर सल्लागार, कर व्यावसायिक आणि इतर ज्यांनी हे शक्य केले त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे .