डेब्रिज पथकांकडून प्लास्टिकविरोधी कारवाईची मोहिम! 400 किलोच्या साठ्यासह 75 हजारांचा दंड वसूल

 


तुर्भे (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्लॅस्टिक विरोधातील कारवाई तीव्र करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी आढावा बैठकीत दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या डेब्रिज भरारी पथकाने पालिकेच्या हद्दीत प्लास्टिक वापरणार्‍यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. काल या परिमंडळ -1 च्या माध्यमातून कारवाई करून 400 किलो प्लास्टिकचा साठा जप्त करून संबंधितांकडून 75 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, यापुढे रोज अशा स्वरुपाच्या  प्लस्टिकविरोधी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली  आहे.