जेएनपीटी (वार्ताहर) - धुतूम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शरद धावजी ठाकूर निवड झाली आहे. धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली, या निवडणुकीमध्ये धुतूम परिवर्तन आघाडीचे उमेदवार शरद ठाकूर यांचा 6 विरुद्ध 4 अशा फरकाने विजय प्राप्त झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुतूम ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनोद मोरे यांनी काम पाहिले.
शरद ठाकूर यांची धुतूम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड होताच धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा शरद ठाकूर, माजी सरपंच धनाजी ठाकूर, माजी उपसरपंच सदानंद ठाकूर, माजी उपसरपंच वैशाली पाटील, माजी उपसरपंच आशा महेंद्र ठाकुर, माजी उपसरपंच सविता रुपेश ठाकूर, माजी उपसरपंच सुंदर पाटील, डी.आर. ठाकूर ज्येष्ठ नेते, श्याम ठाकूर आदिंसह इतर ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच शरद ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.