व्यापार्‍यांचा मालमत्ता कर माफ करा!

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - टाळेबंदीच्या काळात कमर्शिअल सर्विंस पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे या काळात व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नूकसानीला सामोरे जावे लागले. या बाबींचा विचार करून नवी मुंबईतील व्यापार्‍यांचा मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी नवी मुंबई काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेवून या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
या भेटीदरम्यान, मालमत्ता कर माफीसह नवी मुंबईत खालच्या स्तरावर वाढलेल्या भ्रष्टाचारच्या मुद्दयासह नागरी कामांचा दर्जा व पुन्हा पुन्हा काढण्यात येणारी नागरी कामे आदी मुद्दंयावरही चर्चा करण्यात आली असल्याचे कौशिक यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.