ना. एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण... खारेगांव उड्डाणपुल वाहतुकीस खुला


 ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महानगरपालिका आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने खारेगांव येथील लेव्हल क्रॉसिंग येथे बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा शनिवारी राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, खा.श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. 

खारेगांव उड्डाणपुलासाठी जागा हस्तांतरण करणे, पुलाच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात ठाणे महानगरपालिकेचा वाटा हा महत्वाचा आहे. नागरिकांचे जीव वाचावेत यासाठी रेल्वेपुलासाठी निधी उपलब्ध करुन देणारी ठाणे ही देशातील पहिली महापालिका असल्याचे उद्गगार ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपूल या नावाने हा पूल ओळखला जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास उप महापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती  प्रियांका पाटील, कळवा प्रभाग समिती अध्यक्षा वर्षा मोरे, नगरसेविका अ‍ॅड. अनिता गौरी, विजया लासे, मंगल कळंबे, आरती गायकवाड, अपर्णा साळवी,प्रमिला केणी, नगरसेवक गणेश कांबळे, उमेश पाटील, महेश साळवी, प्रकाश बर्डे,  राजेंद्र साप्ते, सुधीर कोकाटे अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी, नगर अभियंता अर्जुन अहिरे,उप अभियंता प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता मोदे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

कळवा खारेगांवचा विकास हा खर्‍या अर्थाने 2009 पासून झाला, कळवा पूर्व भागात नागरिकांसाठी सुस्थितीतीत रस्ते, पाणी या गोष्टीमिळाल्या, खारेगांव उड्डाणपुल तयार होण्यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु त्या सर्व अडचणींवर मात करीत अखेरीस हा पूल तयार झाला असून ठाणे महापालिकेने कळवा खारीगांवमध्ये केलेल्या विकासकामांचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले.