घणसोली (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील घर नं. 2231/031, दत्तनगर, घणसोली, याठिकाणी तळमजला+2 मजले आरसीसी बांधकाम पूर्ण असलेल्या इमारतीचे तिसर्या मजल्याचा स्लॅब प्रगतीपथावर असलेल्या इमारतीस नवी मुंबई महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. सबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. सदरील बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती, असे असतानाही त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम पुनश्च सुरू ठेवले होते.
शेतकर्यांनी जमिन मोजणी प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे जमिन संपादनाचा मोबदला तसेच इतर गोष्टींसंदर्भात निर्णय घेतल्यानंतरच जमिन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे न झाल्यास नाईलाजास्तव शेतकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी शेतकर्यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरसाठी मौजे निताळे, वावंजे, नितळस या गावांमधील संपादित करण्यात येणार्या जमिनींची मोजणी पूर्णपणे थांबवावी अन्यथा शासनास संघर्षाला सामोरे जावे लागेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनातून अधोरेखित केले आहे.