पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल येथील तीर्थरूप आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉ.सुरेखा मोहोकर, सारिका भगत आणि पनवेल महापालिकेमधील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली होती. डायलिसिस सेंटर आणि ब्लड स्टोरेज युनिटचे काल पालकमंत्री नामदार कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस प्रशांत पाटील, विरोधी पक्ष नेता प्रितम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेस नेते सतीश पाटील, शिवदास कांबळे, सुदाम पाटील नगरसेवक गोपाळ भगत, रवींद्र भगत, डॉ.सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, मा.नगराध्यक्ष सुनील मोहोड, मा.उपनगराध्यक्ष गणेश म्हात्रे, मा.नगरसेवक डी.पी.म्हात्रे, पनवेल अर्बन बँक संचालिका माधुरी गोसावी, काँग्रेस नेत्या निर्मला म्हात्रे, शशिकला सिंग, ताहीर पटेल, विजय पाटील, विजय भोईर, तहसिलदार विजय तळेकर, सिव्हिल सर्जन डॉ.सुहास माने, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन संकपाळ, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, डॉ.बॉईटे, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.सुरेश पंडित, डॉ.अरुणा तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. डायलेसिस करण्याचा खर्च हा सामान्य नागरिकाच्या आवाक्या बाहेर आहे जर सेंटर सुरू झाले तर त्याचा लाभ पनवेल मधीलच नाही तर पनवेलच्या आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिकांना होणार आहे.
पनवेल शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यास काही महिन्यापासून लागणारी उपकरणे देखील येथे बसवण्यात आलेली होती. परंतु तज्ञांची निवड करण्यात आली नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. रायगड जिल्ह्यातून येथे उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण येत असतात. किडनी आणि मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे खर्चिक असल्याने जिल्ह्यातील रुग्ण दगावण्याची संख्यादेखील वाढत होत होती, त्यामुळे तातडीने संबंधित विभागास आदेश देऊन नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तज्ञांची निवड करून सेंटर सुरू करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आरोग्यमंत्री आणि, राज्याच्या राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. नवीन वर्षात डायलेसिस सेंटर सुरू होत असल्याने पनवेलकराना ही नववर्षाची भेट आहे.
पनवेलचे डायलेसिस सेंटर सुरू होत असल्याने त्याचा लाभ गोर गरीब आणि गरजू नागरिकाना होणार आहे.