कळंबोलीमध्ये दाखल होणार हिंदुहृदसम्राट ज्योत!

 


कळंबोली (वार्ताहर) - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर  मावळचे खा.श्रीरंग आप्पा बारणे व रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने रविवार दि.23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता शिवतीर्थ येथे हिंदूह्रदयसम्राट ज्योत मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर व जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते प्रज्वलित करून कळंबोली येथे आणण्यात येणार असल्याची माहिती नुकत्याच शिवसेनेच्या रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या सभेत देण्यात आली. या कार्यक्रमासाठी शिवसैनिकांसह शिवसेना प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.