क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


 पनवेल (प्रतिनिधी) - महिला शिक्षणासाठी आपले सारे आयुष्य वेचलेल्या समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पनवेल महापालिका मुख्यालयात काल सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख कांतिलाल पाडवी, पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.