आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन
ऐरोली (प्रतिनिधी) - बीएसव्हीची कोव्हिड साथ व्यवस्थापनात मोलाची मदत लाभली असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऐरोलीत काल केले.
भारत सीरम्स अँड वॅक्सिन्स (बीएसव्ही) या भारतातील आघाडीच्या बायोफार्मास्युटिकल कंपनीने, महाराष्ट्रातील ऐरोली येथील जागतिक दर्जाच्या आरअँडडी केंद्राच्या माध्यमातून, नवोन्मेष व शास्त्रशुद्ध संशोधनाला चालना देण्याप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीचा, पुनरुच्चार केला. या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला बीएसव्हीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नवांगुळ, इंडिया बिझनेसचे सीओओ विश्वनाथ स्वरूप आणि आरअँडडीचे प्रमुख डॉ. जेबी जेकब उपस्थित होते.
बीएसव्हीसारख्या कंपन्या गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्रात नवोन्मेष घडवत आल्या आहेत आणि जीवशास्त्रीय तसेच जैवतंत्रज्ञानिक क्षेत्रातील कितीतरी उत्पादने भारतात प्रथमच तयार करण्याचा मान मिळवत आल्या आहेत. बीएसव्हीने कोविड साथीदरम्यान लिपोझोमल अँफोटेरिसिन बीच्या उत्पादनासोबत केलेल्या सहयोगामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात तसेच कोविड साथीच्या व्यवस्थापनात खूप मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.