पनवेल (वार्ताहर) - शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रविवारी पनवेल येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय नुतनीकरण उद्दघाटन सोहळा मावळ लोकसभा खा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते व तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. याप्रसंगी प्रवीण जाधव यांची पनवेल शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रमेश गुडेकर, शिरीष बुटाला, उपजिल्हा संघटक परेश पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका कल्पना पाटील, विधानसभा संघटिका रेवती सकपाळ, तालुका संघटिका प्रमिला कुरघोडे आदींसह उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवासेना व युवतीसेना पदाधिकारी तसेच महिला आघाडी व शिवसैनिक तसेच पनवेल येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.