घणसोली (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयातर्फे काल हद्दीतील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत पथकाकडून 10 हातगाड्यांसह काही टेबल, आईस्क्रीमच्या गाड्या, खुर्च्या, नासीवंत माल जप्त करण्यात येवून ते कोपरखैरणे येथील डम्पिंग ठिकाणी जमा करण्यात आले असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
घणसोलीत बेकायदा फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला होता. याबाबत नागरिकांकडून महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार काल अखेरीस विभाग कार्यालयातर्फे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.