खारघर (वार्ताहर) - कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने पनवेल महापालिकेने खारघरमधील डी-मार्टवर कारवाई करून सदर आस्थापनेला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या नियमानुसार रात्री 9 नंतर व्यावसायिक आस्थापने बंद करण्याच्या सुचना आहेत. हे नियम डावलून खारघर परिसरातील डी-मार्टमध्ये रात्री उशिरापर्यंत व्यवहार सुरू असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे येथे प्रमाणापेक्षा अधिक गर्दी निदर्शनास आल्याने प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी डी-मार्टवर कारवाई करत त्यांचे दरवाजे सिल केले होते. मात्र त्यानंतरही सिल केलेले शटर बंद ठेवून दुसरे शटर उघडून त्यांनी व्यवहार सुरू केला. हे निदर्शनास आल्यानंतर डी-मार्ट व्यवस्थापना विरोधात पालिकेने दुसर्यांदा कारवाई करत त्यांना 25 हजाराचा दंड ठोठावला आहे.