खारघरमधील विविध पक्ष कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
• Dainik Lokdrushti Team
खारघर (वार्ताहर) - शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघर वसाहतीमधील शेकडो नागरिकांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी उप महानगर प्रमुख दीपक घरत, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, उपशहर प्रमुख वैभव दळवी आदींसह सर्व उप विभाग प्रमुख शाखाप्रमुख आणि उप शाखा प्रमुख व शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.