योग्य आहार हीच समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली - आहारतज्ञ सायली भोसले
आयुष्यात आपण कितीही मोठे यश संपादन करू शकता मग पैसा, प्रसिद्धी किंवा इतर असो, या सर्वांना तेव्हाच महत्व आहे. जेव्हा तुमचे आरोग्य उत्तम असते तेव्हा तुमचे वजन नियंत्रणात आहे असे समजावे. वजन वाढले की तज्ञ सांगतात की दोनशेच्यावर आजार तुमच्या पाठीमागे लागतात. आरोग्यावर लक्ष द्यायचे असेल तर तुमच्या पोटात उत्तम आहार जाणे गरजेचे आहे. नाहीतर वजन वाढून इतर आजारांना आमंत्रण दिले जाते. आपण योग्य व्यायाम करत असणार परंतु , आहारावर लक्ष देत नसाल तर त्या गोष्टीला महत्त्व राहत नाही. यासाठी कित्येक जिम व व्यायामशाळा आहार तज्ञांशी सल्लामसलत करतात कित्येकांनी तर आपला वैयक्तिक आहारतज्ञ सल्लागार म्हणून निवडला आहे. मुंबई पोलिसांनी आपले पोलिस फिट रहावे याकरिता आहारतज्ञ सायली भोसले यांचे मार्गदर्शन घेतले व याचा फायदा म्हणून पोलिसांनी आपले वजन नियंत्रणात आणले. त्याचबरोबर त्यांच्या इतर व्याध्या सुद्धा दूर झाल्यात. कित्येक पोलीसांना आम्लपित्ताचे आजार होते, योग्य वेळी योग्य आहार खाल्ल्यामुळे ते दूर झालेत. आहारतज्ञ सायली भोसले या सांगतात की "खाण्यावर नियंत्रण आणले, जेवणाच्या वेळा बदलल्यात तर विविध आजार दूर जातात आणि आपले वजन सुद्धा नियंत्रणात राहते. कोणते पदार्थ कोणत्या पालेभाज्या खाल्ल्या तर आपल्या शरीराला योग्य पोषण मिळते हे आपल्याला आहार तज्ञ सांगू शकतात. उच्चरक्तदाबा सारखे आजार हे केवळ वजनामुळे मागे लागतात. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायामासोबतच योग्य आहार तोही योग्य वेळेत मिळाला पाहिजे. हृदयविकार, मधुमेह यासारख्या मोठे आजार आपल्याला होऊ नये म्हणून आहार योग्य असणे गरजेचे आहे. कोविड काळात खूप लोकांची जीवनशैली बदलली, घरी बसल्यामुळे वजन वाढले या वजनाला नियंत्रित करण्यासाठी व्यायाम व आहार हे योग्य असणे गरजेचे आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आहार तज्ञ सायली भोसले विविध शहरात विविध संस्थांसाठी मोफत मार्गदर्शन करतात.