मुंबई - दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. त्यासाठी मंडळाने तयारीही सुरू केली आहे. मंडळाने 17 क्रमांकाच्या अर्ज भरणार्या विद्यार्थ्यांना मुदत वाढ दिली आहे.
राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे, त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु मंडळाने परीक्षेची तयारी सुरू केल्याने हा परीक्षा ऑफलाईनच होतील असे सांगण्यात येत आहे.
दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने तयारी सुरू केली आहे. यापूर्वीच दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 4 मार्चपासून बारावीची आणि 15 मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत दहावीच्या आणि 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीपर्यंत तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांची सुरुवात होणार आहे. तसेच 17 क्रमांकाचा फॉर्म भरून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी 12 जानेवारी अखेर दिनांक असून विलंब शुल्क भरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची मंडळाने दिली आहे.