राज्य सरकारची नवी नियमावली जाहिर... राज्यात रात्रीची संचारबंदी!

 


मुंबई - राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकार्‍यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.

रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. राज्य सरकारचे नवे निर्णय नेमके काय-काय? उद्या मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचार बंदी. नाईट कर्फ्यू घोषीत. राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय.

अशी आहे नियमावली...

 दिवसा 5 पैक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही.  रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार.  50% नाट्यगृह, सिनेमागृह राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद.  दिवसा 50 % क्षमतेने सुरू रहणार.  बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्‍यांना 72 तास आधीचा आरटीपीसीआर चाचणी बंधणकारक.