पनवेल (वार्ताहर) - रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्यावतीने साई देवस्थान साई नगर वहाळ येथे भारतात प्रथम पॅसेंजर इलेक्ट्रॉनिक ई रिक्षाचे एका गरजू कुटुंबाला वाटप करण्यात आले.यावेळी रोटरी 3131 चे डी. जि पंकज शहा, रोटरीचे डॉक्टर गुणे, एनआरआय पोलिस ठाण्याचे वपोनि रवींद्र पाटील, साई देवस्थानचे रवींद्र पाटील, पर्यावरण डायरेक्टर जयदीप मालविया, असिस्टंट गव्हर्नर सागर गुंडेवार, सुनील कुरूप आदी उपस्थित होते.