राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 

वाशी (प्रतिनिधी) - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वाशीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला रणरागिणींकडून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ.प्राजक्ता गणेश मोंडकर यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.