दिवाळे गावातील बेकायदा फेरिवाल्यांसह शेड्सवर पालिकेची कारवाई

बेलापूर (वार्ताहर)-नवी मुंबई महापालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांसह फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहिम उघडली असून काल बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात दिवाळे गावातील बेकायदा फेरिवाल्यांसह शेड्सवर पालिकेने धडक कारवाईची मोहिम राबविली.

या कारवाईत, बेलापूर विभाग कार्यालय हद्दीतील दिवाळे गाव येथील मच्छी मार्केट समोरील परिसरात असलेले 6 धाबे व 38 फेरीवाले तसेच विनापरवानगी उभारलेल्या 26 पावसाळी शेड जेसीबी व गॅस कटरच्या सहाय्याने अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात आले. तसेच 52 फेरीवाल्यांविरोधात कारवाई करून त्यांचे भाजीपाला,फळे व इतर सामान जप्त करून कोपरखैरणे येथील क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले.

या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह 25 मजूर, 1 मुकादम, 1 पीकअप व्हॅन, 2 जेसीबी, 2 ट्रक, 1 गॅस कटर तसेच अतिक्रमण विभागाकडील मोठे वाहन व अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक  असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.बेलापूर (वार्ताहर)-नवी मुंबई महापालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांसह फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहिम उघडली असून काल बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात दिवाळे गावातील बेकायदा फेरिवाल्यांसह शेड्सवर पालिकेने धडक कारवाईची मोहिम राबविली.

या कारवाईत, बेलापूर विभाग कार्यालय हद्दीतील दिवाळे गाव येथील मच्छी मार्केट समोरील परिसरात असलेले 6 धाबे व 38 फेरीवाले तसेच विनापरवानगी उभारलेल्या 26 पावसाळी शेड जेसीबी व गॅस कटरच्या सहाय्याने अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात आले. तसेच 52 फेरीवाल्यांविरोधात कारवाई करून त्यांचे भाजीपाला,फळे व इतर सामान जप्त करून कोपरखैरणे येथील क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले.

या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह 25 मजूर, 1 मुकादम, 1 पीकअप व्हॅन, 2 जेसीबी, 2 ट्रक, 1 गॅस कटर तसेच अतिक्रमण विभागाकडील मोठे वाहन व अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक  असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.