जेएनपीटी (वार्ताहर) - प्रथम एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून रानसई गावात सुरू करण्यात आलेल्या ग्राम शिक्षा केंद्राचे उद्घाटन सरपंच गीता भगत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्याम लेंडे, शिक्षक संजय,रा.जि.प. शाळेच्या शिक्षिका जान्हवी कडू,सुनिता म्हात्रे, आरोग्य सेविका दमयंती ठाकूर, कुष्ठरोगतज्ञ रामदास देसले तसेच प्रथम संस्थेचे काशिराम निरगुडे व जिल्हा समन्वयक प्रतिक खुंटे आणि पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी ग्राम शिक्षा केंद्रासाठी सरपंच गीता भगत आणि शालेय शिक्षिका जान्हवी कडू यांच्यातर्फे पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. सर्वप्रथम गावात काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान गावकर्यांच्या माध्यमातून सर्व वयोगटासाठी उपयुक्त ठरतील अशी पुस्तके ग्राम शिक्षा केंद्रासाठी प्रदान करण्यात आली.
रानसई येथे ग्राम शिक्षा केंद्राची स्थापना