जेएनपीटी (वार्ताहर) - एकात्मिक बाळ विकास योजनेच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील नागाव शाळेच्या अंगणवाडी सेविकांनी मुलींचे समाजात महत्वाचे स्थान आहे हे पटविण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव साठी गावामध्ये रॅली काढून प्रबोधन करण्याचे काम हाती घेतले आहे.
आजही समाजामध्ये मुलीला समान मान असताना मुलींना वागणूक मिळत नाही तर मुलींना शिक्षनामध्ये मागे ठेवले जाते तसेच आज समाजामध्ये मुलींचे प्रमाण ही कमी झाले आहे जवळजवळ 1000 पुरुषांच्या मागे 850 ते 900 स्त्रीया आहेत. वंशाला दिवा पाहिजे या साठी मुलींचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
मात्र स्त्री चे महत्व खूप मोठे आहे तिच्या मुळेच सार काही घडत आहे काही होऊ शकते ,एक स्त्री शिकली तर सारे कुटूंब शिकत असते या साठी एक मुलगी वाचणे आणि ती पुढे शिकणे हे महत्वाचे आहे या दृष्टीकोनातून आज नागाव शाळेतील अंगणवाडी सेविकांनी बेटी बचाव बेटी पढाव साठी रॅली काढून समाज प्रबोधन केले तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना याचे ही महत्व पटवून दिले.