नेत्ररोगतज्ञ डॉ. वैशाली पाटील यांचे वाशीत ‘श्री नेत्रालय’ सुरु!

 


वाशी (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. वैशाली सचिन पाटील यांच्यावतीने वाशी से-14 येथील डॅफोडिल्स को- ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या श्री क्लिनिकचा उदघाटन समारंभ आ. गणेश नाईक यांच्याहस्ते नुकताच पार पडला. या समारंभासाठी ब्लाईंड गेम, झेंडा, मोरया व इतर असंख्य मराठी चित्रपटातून चांगल्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा मराठमोला अभिनेता संतोष जुवेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली होती. वाशीतील सदर श्री क्लिनिकमध्ये अत्याधुनिक अशा यंत्रसामुग्रीचा वापर करून नेत्र विषयक समस्या असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

याप्रसंगी आ. गणेश नाईक यांनी डॉ. वैशाली पाटील यांच्यावतीने आरोग्य क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याचे कौतूक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या. यावेळी डॉ. वैशाली पाटील यांचे पती व बोरिवली येथील आरटीओ कार्यालयात अधिकारी पदी कार्यरत असलेले सचिन पाटील उपस्थित होते. श्री क्लिनिकच्या उदघाटन समारंभप्रसंगी आरोग्य, सामाजिक व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीने हजेरी लावून डॉ. वैशाली पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या.