केमिस्ट ब्लड बँकेच्या ऐरोलीतील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 


ऐरोली (प्रतिनिधी) - नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनच्या सानपाडा येथील  केमिस्ट ब्लड बँकेच्यावतीने व ऐरोली से-2 येथील मोदी हॉस्पीटलच्या सहकार्याने मोदी हॉस्पीटलमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरास रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी राकेश नलावडे यांच्यासह नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे जाईंट सेके्रटरी शंकर जेजुरकर, जाँईट सेक्रेटरी व ऐरोलीतील संदीप मेडिकल स्टोअर्सचे मालक संदीप देशमुख, गोपीचंद साबळे, रबाळेतील निलम मेडिकल स्टोअर्सचे लहानु ननावरे, विद्यानंद झा व इतर असंख्य औषध विक्रेते यावेळी उपस्थित होते.