वाशी (प्रतिनिधी) - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोाधत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. काल नवी मुंबई भाजपच्यावतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाना पटोले यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. नवी मुंबई भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सदरचे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांच्यासह इतर असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला.