थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनमध्ये कोव्हिड नियमंाचे उल्लंघन!


 नवी मुंबई (प्रतिनिधी) - थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनमध्ये कोव्हिड नियमंाचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत 4 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

या कारवाईत से-40, नेरूळ येथील सीवूड वाईन्स आणि से-10 वाशी येथील संजय लंच होम या आस्थापनांकडून प्रत्येकी रू. 10 हजार याप्रमाणे दंड वसूल केला आहे. यासह आपल्या रेस्टॉरंट, बारच्या 50 टक्के क्षमतेपेक्षा अधिक गर्दी असलेल्या 9 ठिकाणी म्हणजेच से-3 ऐरोली येथील हॉटेल साईप्रकाश, से-2 ऐरोली येथील प्रियंका हॉटेल, सानपाडा रेल्वे स्टेशनजवळील रसोई रेस्टॉरंट अँड बार तसेच शालीन रेस्टॉरंट, एपीएमसी मार्केट तुर्भे जवळील विसावा हॉटेल, पामबीच गॅलरिया येथील एजंट जॅक्स बार, बेलापूर येथील फ्लेमिंगो रेस्टरंट, सेक्टर 7 कोपरखैरणे येथील लक्ष्मी हॉटेल व सेक्टर 14 कोपरखैरणे येथील न्यू पंचरत्न हॉटेल यांच्याकडून कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्यापोटी प्रत्येकी 50 हजार प्रमाणे दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.