मुंबई - पेपरफुटीच्या कारणामुळे ऐनवेळी रद्द करण्यात आलेली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठीची परीक्षा सुरु झाल्या आहेत.
राज्यभरातील 106 परिक्षा केंद्रावर ही परीक्षा होत असून, यावेळेस ही परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपविण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होत असून, परीक्षार्थींना परिक्षा केंद्रावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने ही परिक्षा द्यायची आहे. म्हाडामधील एकूण 565 पदांसाठी ही परिक्षा होत आहे. राज्यभरातील दोन लाख 60 हजार उमेदवार ही परीक्षा देत आहेत.
दरम्यान, 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान ही परिक्षा होत असून दिवसभरात तीन शिफ्टमधे म्हाडाची परिक्षा होत आहे. डिसेंबर महिन्यात होणार्या या परिक्षेच्या आधी पेपर फुटल्याचे पुणे पोलिसांना आढळून आल्याने ऐनवेळेस ही परिक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर ही परिक्षा घेण्याची जबाबदारी आता टीसीएस कंपनीवर सोपविण्यात आली आहे. म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गासाठी ही परीक्षा होत आहे. एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने म्हाडा ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मागच्या वर्षी घेण्यात येणार्या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. ही म्हाडाची परीक्षा 565 पदाकरिता होत आहे. ऑफलाईन होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस या नामांकित कंपनीवर सोपवण्यात आली आहे. विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएसला ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी जीए सॉफ्टवेअर या कंपनीकडे जबाबदारी होती, परंतु पेपरफुटी घोटाळा उघड झाल्याने त्यांचे काम काढून घेण्यात आले आहे. यामुळे म्हाडाकडून ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली.