पनवेल (वार्ताहर)- रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे 14 वर्षाखालील मुलांची लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी 10 व 11 डिसेंबर 2021 रोजी, उरण येथील उरण क्रिकेट अँड स्पोर्टस असोसिएशन यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीला चारशे मुलांचा सहभाग लाभला होता. या दोन दिवसीय निवड चाचणीतून एकूण 90 मुलांची पुढल्या फेरीकरीता निवड करण्यात आली व त्यांच्या मध्ये प्रत्येकी 15 जणांचे सहा संघ तयार करून सहा निवड चाचणी सामने खेळवण्यात आले. त्यातून अंतिम निवड चाचणी करिता 48 मुलांची निवड करण्यात आली. त्यामधून अंतिम 25 जणांची निवड करण्यात आली व त्यातील पहिल्या 1 ते 14 जणांची टीम रायगड म्हणून निवड करण्यात आली. उर्वरित 15 ते 20 स्टँड बाय व 21 ते 25 राखीव खेळाडु असतील.
जॉन्टी गलबले, सुमित झुंझारराव,विनेश ठाकूर, अजित म्हात्रे यांनी सिलेक्टर व सुहास हिरवे यांनी कोऑर्डीनेटर म्हणुन काम पाहिले. टीम रायगड आता नाशिक येथे होणार्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इन्व्हीटेशन लीग टूर्नामेंट 21-22 मध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झाली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सभासदांतर्फे सरचिटणीस विवेक बहुतुले यांनी निवड झालेल्यांना शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.