14 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांची स्पर्धा...


पनवेल(वार्ताहर) - नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या  14 वर्षाखालील मुलांच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये रायगड संघाने आपल्या गटातील तीन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यामध्ये हिंगोली विरुद्ध विजय मिळवून सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले. नाशिक विरुद्धचा दुसरा सामना बरोबरीत सुटला.